नियम व फायदे

महत्त्वाची टीप

  • पर्यटकांची ने-आण करण्यासाठी मुंबई किंवा पुण्यातून येणाऱ्या ओला-उबेर गाड्यांना लोणावळ्यात थांबून नवीन प्रवासी (भाडे) घेण्यास लोणावळा नगरपरिषदेने व स्थानिक टॅक्सी संघटनेने सक्त मनाई केली आहे.
  • जर कोणत्याही सभासद लोणावळा व खंडाळा शहरामध्ये ओला किंवा उबर यांचे भाडे घेताना आढळल्यास किंवा शिवज्योत प्रतिष्ठानाच्या नावाचा गैरवापर केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्याचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द केले जाईल.
  • याशिवाय लोणावळा किंवा खंडाळा परिसरात सभासदास जाणीवपूर्वक कोणी त्रास दिल्यास किंवा अडथळा निर्माण केल्यास, कृपया तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा. मो. ९७६४६३०२२२

सभासदांसाठी सूचना

  • सभासदांनी प्रवाशांशी विनम्रतेने, प्रामाणिकपणे आणि सुरक्षिततेची काळजी घेत वागावे. (सभासदांचे आचरण संघटनेच्या प्रतिष्ठेचे प्रतिबिंब आहे.)
  • वाहन स्वच्छ, नीटनेटके आणि आवश्यक कागदपत्रांसह ठेवणे अनिवार्य आहे. (आरटीओ, विमा, परवाना आणि पॉल्युशन प्रमाणपत्र अद्ययावत असावे.)
  • संघटनेचे नियम, सभा व कार्यक्रम यामध्ये सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित आहे. (संघटनेच्या प्रगतीत प्रत्येक सभासदाचे योगदान महत्त्वाचे आहे)
  • सभासदांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघटनेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतील. उदा. मार्गदर्शन शिबिर, रक्तदान शिबिर, सामाजिक उपक्रम आणि मनोरंजनाचे कार्यक्रम.

आमच्या संघटनेसोबत जोडण्याचे फायदे

🌍 आंतरराष्ट्रीय संधी

सभासदांना Travel Dex या नामांकित आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपनीसोबत काम करण्याची उत्कृष्ट संधी.

🏠 राहण्याची व जेवणाची सवलत

मुंबई, लोणावळा आणि पुणे येथे सभासदांना अल्प दरामध्ये निवास व जेवणाची सुविधा उपलब्ध.

🚗 वाहन सेवा सवलतीत

सभासदांच्या गाड्यांसाठी सर्व्हिसिंग, कार वॉशिंग, इन्शुरन्स व आरटीओची कामे अत्यंत कमी दरात करून दिली जातील.

☎️ 24 x 7 आपत्कालीन सुविधा

सभासदांसाठी २४ तास आपत्कालीन मदत सेवा उपलब्ध राहील.

सर्व नियमांशी सहमत आहात?

आजच सभासद व्हा